भूम (प्रतिनिधी)-  येथील कल्याणसागर समूहातील कल्याणसागर माध्यमिक. वि. परंडा, व सरस्वती प्राथमिक. शा. परंडा या विद्यालयाच्या प्रांगणात श्री संत भगवान बाबा यांच्या पालखीचे आगमन सकाळी 11.00 वा. झाले. यावेळी पालखीचे पूजन कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार  सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. सुजितसिंह ठाकूर यांनी सपत्नीक पालखीचे पूजन केले. यावेळी परंडा न. प. उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर,उपनगराध्यक्ष तथा कल्याणसागर विद्यालय डोमगावचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, भगवान बाबांचे चौथे वंशज, कृष्णा महाराज तसेच राजपूत महाराज,  खेडकर गुरुजी, भगवान महाराज, अतुल महाराज शास्त्री, विवेक महाराज, संतोष महाराज, डॉ. आनंद मोरे, डॉ. पाटील, डॉ. जयश्री गोफणे, डॉ. कोरबू, डॉ. कांबळे, श्रद्धा बोराडे, शिंदे, चव्हाण, गायकवाड मॅडम, चव्हाण सिस्टर, सुखदेव ठोंपे, सौदागर टोपे, अविनाश विधाते, महावीर काशीद, संचालक, जगदीश डाके, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक किरण गरड, सर्व पत्रकार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top