कळंब (प्रतिनिधी)- स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील वाढता भ्रष्टाचार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेचा झालेला बट्ट्याबोळ आणि दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी याविरोधात आज कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. तेथून तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी व तरुणांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थी व युवकांच्या भवितव्याशी उघडपणे खेळणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडली जावी. पेपरफुटी आणि गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. राज्यातील प्रत्येक पात्र व होतकरू युवकाला न्याय मिळावा. या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार गोपाळ भराडिया यांनी स्वीकारले. सरकारचे लक्ष फक्त टक्केवारीवर असल्यामुळे तरुणांचे भविष्य टांगणीला लागले आहे अशी टिका तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे यांनी केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब कथले, ज्येष्ठ नेते रंजीत तात्या बारकुल, मुसंदिक काजी, सुरेश काका टेकळे, बालाजी अल्टे, रमेश देशमुख, आत्माराम बिक्कड, बालाजी वाघमारे, सलमा सौदागर, सुनंदा भोसले, सुमती तोरसले, चेतन वाघमारे, भरत शिंदे, औदुंबर धोंगडे, आफताब तांबोळी, वाहेद पटेल, राकेश तापकीर विठ्ठल कोकाटे, किरण खोसे, वैजनाथ शेटे, दत्तात्रय तवले, बालाजी वाघमारे, अशोक धोंगडे, समाधान वाघमारे, परमेश्वर करडे, गणेश गुंड, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
