धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात तेरणा सोशल फाऊंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर बुधवार दि. 22 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबीरास 200 तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. यांचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले.
भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, ॲड. नितीन भोसले, ॲड. खंडेराव चौरे आदी उपस्थित होते. आलेल्या रूग्णांच्या सेवेसाठी व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भाजपाचे 200 स्वयंसेवक सहकार्य करणार आहेत. या महाआरोग्य शिबीरामध्ये सर्व रोगावर उपचार केले जाणार असून, अधिक उपचारासाठी तेरणा सोशल फाऊंडेशन सोय करणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. या महाआरोग्य शिबिरामध्ये आरोग्य शिक्षण एक विभाग राहणार असून, त्यांचा लाभ लोकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन नितीन काळे यांनी याप्रसंगी केले.
