तुळजापूर (प्रतिनिधी)-  शहरातील नगरपरिषद पाठीमागील सिटी सर्व्हे क्र. 972 मधील भाजी मंडईसाठी आरक्षित जागेवर दिशाभूल करून बांधकाम परवाना मिळविण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांनी संबंधित प्राधिकरणाकडे केली होती.

तक्रारीची प्राथमिक पडताळणी व उपलब्ध कागदपत्रांच्या अवलोकनानंतर, संबंधित जागेचे 30 ऑक्टोबर 1978 रोजी भूसंपादन होऊन ती नगर परिषदेच्या नावे झालेली असून, त्याचा मोबदलाही अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांना नोटीस बजावून सदर जागेवरील सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणात त्यांचे म्हणणे 7 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, बांधकाम त्वरित न थांबविल्यास किंवा विहित मुदतीत उत्तर सादर न केल्यास, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील तरतुदीनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 


 
Top