भूम (प्रतिनिधी)- भूम तालूक्यातील माणकेश्वर येथे मल्हार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 11 जुलै रोजी शेतकरी संवाद दौरा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी मल्हार पाटील यांनी शेतक-यांशी थेट संवाद सादत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमाला माणकेश्वर सह परिसरातील ग्रामस्थ शेतकरी आणि भाजपचे विविध मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतरस्त्यांच्या अडचणी आणि गावातील विविध विकासकामां संदर्भातील समस्या मांडल्या. शेतरस्ते मोकळे होणे, पिक विमा रखडलेले अनुदान आदी समस्या माडत तात्काळ मार्ग काढण्याची विनंती केली. आणि इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी गावातील शिवस्मारकाच्या सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. यामुळे गावकऱ्यांसह शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच माणकेश्वर येथील जाग्रत देवस्थान मेहबूब सुभानी दर्गा येथे तीर्थक्षेत्र निधीतून सभागृह व शौचालय बांधण्याचे देखील आश्वासन देण्यात आले आहे. तसेच हिंदू स्मशान भूमीस संरक्षण भिंत, सुशोभिकरण तसेच गावातील मारूती मंदीर ते स्मशान भूमि पर्यंत स्टेट लाईटचे ही अश्वासन देण्यात आले. शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी कामगार मोर्चाचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, समाज कल्याण सभापती धाराशिव विशाल कोकणे व भाजपा कार्यकारणी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
