मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाच्या वतीने जागतिक कागदी पिशवी दिन साजरा करण्यात आला.हे कार्यक्रम महासंचालक एनसीसी कार्यालय दिल्ली यांच्या वतीने समाजसेवा आणि सामुदायिक विकास म्हणजे एसएससीडी यांच्या वतीने संपुर्ण देशातील ज्या ठिकाणी एनसीसी आहे अशा शाळा,महाविद्यालयात अशा विविध समाज जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ अर्जुन कटके यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये कॅडेसना प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्यांचा वापर करावा व प्लास्टिक वर आपल्या स्वतः पासुनच कायमची बंदी घालावी असे यावेळी त्यांनी सांगितले कारण की आज आपण जिकडे पाहतो तिकडे रोडच्या कडेला शेतात ,नदी पात्रात, जंगलात,पाण्याच्या गटारी,सार्वजनिक,पर्यावरण ठिकाणी आपणास केवळ प्लास्टिक बॅग व पाण्याच्या बाटल्या दिसतात.खरंच आपणाला पर्यावरणाचे संरक्षण करायचे असेल मानवाला भविष्यात चांगले जीवन जगायचे असेल तर आपण सर्वांनी पर्यायी व्यवस्था म्हणजे कागदी पिशव्यांचा वापर करावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले. समाजात जनजागृती करण्यासाठी अनेक कॅडेटसनी शहरात रॅलीदवारे कागदी पिशव्या ,फुले,लहान मुलाची खेळणी,देखावे स्वतः कागदाचे बनवुन शहरात स्त्रिया व पुरुषांना जागोजागी जाऊन त्याबदल माहिती देऊन कागदी पिशव्याचे वाटप केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य संजय अस्वले प्रमुख होते. प्रमुख उपस्थिती डॉ पदमाकर पिटले, कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले,डॉ चंद्रसेन करे,डॉ समाधान पसरकले, दिशा ॲकडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ राम जाधव तसेच कॅडेटस,विद्यार्थी,प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.

या कॅडेटसच्या कौतुकास्पद कार्याबदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top