धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम वसंतराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या शिबिरात युवक युवतींनी रक्तदान केले.  शहरातील लाडक्या बहिणींना आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन अजितदादा विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गवारे यांनी केले होते.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नितीन बागल, प्रा.अंकुश नाडे,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, पंचायत समितीचे माजी सभापती सतीश घोडेराव, महिला जिल्हाध्यक्षा अफसर पठाण, किरणताई निंबाळकर,श्रीमती पाटील, सुधीर सस्ते, ॲड.मुकुंद सस्ते, खलील पठाण,असद पठाण, अतुल जगताप, राजेंद्र जानराव,दौलतराव माने,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी तांबे, जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे,जिल्हा सरचिटणीस राजकुमार मेंढेकर, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी गायकवाड, माजी मुख्याध्यापक राजेंद्र मडके, महिला शहराध्यक्षा ललिता लोमटे, मुख्याध्यापक महेश जाधव,रामलिंग चौरे, संस्था चालक संघटनेचे जिल्हा सचिव लहूराज लोमटे आदी उपस्थित होते.

 प्रारंभी अजितदादा यांच्या प्रतिमेस आ.विक्रम काळे व इतर मान्यवरांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार गवारे यांनी तर सूत्रसंचालन बालाजी तांबे यांनी केले. शेवटी सचिन तावडे यांनी रक्तदाते व लाडक्या बहिणी व इतर उपस्थितांचे आभार मानले.

 
Top