धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. डॉ. अरविंद विजय हंगरगेकर यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई जिल्हा केंद्र धाराशिव येथे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रा. डॉ. हंगरगेकर यांनी शिक्षण क्षेत्रात अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी लेखन, काव्यनिर्मिती, व्याख्याने, साहित्य संमेलने तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून विधायक सामाजिक उपक्रम राबविणे, सांस्कृतिक चळवळींना बळ देणे आणि वैचारिक प्रबोधनाची परंपरा जपणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते.
त्यांच्या या सर्वसमावेशक कार्याचा गौरव म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरने त्यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक संस्था, शिक्षक, प्राध्यापक, कवी, लेखक, मित्रपरिवार, विद्यार्थी आणि हितचिंतकांनी प्रा. डॉ. अरविंद विजय हंगरगेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
