धाराशिव (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष  अर्चनाताई पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या अनुषंगाने केंद्रीय विद्यालयाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील सदस्यांचे धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा नेहा  काकडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. धाराशिव शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने केंद्रीय विद्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका नगर परिषदेकडून व्यक्त करण्यात आली. केंद्रीय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त ए.सी. पाटील, मानखुर्द केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य पवन खंडाल, सोलापूर केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य उमाकांत जोशी यांनी प्रस्तावित जागेबाबत समाधान व्यक्त करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे याच सत्रात केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी सकारात्मकता दर्शविली.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धाराशिवच्या शैक्षणिक विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल ठरणार आहे.

 
Top