धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भोसले हायस्कूल व धाराशिव जिल्हा संस्कार भारती संयुक्त विद्यमाने वेशभुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये इ.5 वी 2 तुकडी व 6 वी 1 तुकडीतून 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत, वारकरी वेशभुषा करून स्पर्धेत सहभागी झाले होते. 

या स्पर्धेचे परिक्षण पी.डी परतापुरे, पी.पी. मैत्रे यांनी केले. बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई सुधीर प होत्या. या प्रसंगी संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, संरक्षक प्रभाकर चोराखळीकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, अनिल मालखरे, बालाजी गोरे, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ यांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना संस्कार भारतीचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्प देऊन गौरविण्यात आले. 

प्रथम रुक्मिणी मनस्वी संतोष टेकाळे, प्रथम संत अभय शंकर देशमुख, प्रथम वारकरी गणेश सुर्यकांत कारंडे यांना बक्षीस वितरण करण्यात आले. हि स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षक एस.एच. जगताप, सुरज सपाटे, शिक्षिका एस. एम.राऊत, डी.एल. कांबळे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले. सुंत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. तर आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.


 
Top