धाराशिव (प्रतिनिधी)-  खरीप 2025 हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटीमुळे वगळण्यात आलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 36 महसूल मंडळांचा तातडीने समावेश करून पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मंजूर करण्यात यावा, अशी ठाम मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या निवेदनात राज्य तांत्रिक सल्लागार समिती च्या अहवालात संबंधित तांत्रिक त्रुटी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. राज्य शासनानेही ही बाब मान्य करून विमा कंपन्यांना पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 36 महसूल मंडळांतील हजारो शेतकरी अद्यापही या लाभापासून वंचित असल्याची बाब खासदार निंबाळकर यांनी मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. 

 
Top