तुळजापूर (प्रतिनिधी)- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) अभियानाला गती देण्यासाठी तुळजापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 10 मध्ये रविवारी (दि. 19 जुलै) विशेष  एसआयआर फॉर्म भरण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयात हे शिबिर होणार असून, पात्र मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत हे शिबिर तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सप्रियांका विजय  गंगणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले आहे. शिबिरास येताना नागरिकांनी पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित बीएलओ यांच्याशी संपर्क साधून मतदार यादीतील माहिती अद्ययावत करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, प्रभाग क्र. 10 मधील एकाही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच ही माहिती आपल्या परिसरातील इतर मतदारांपर्यंत पोहोचवून जनजागृती करावी, असे आवाहन विजय सर गंगणे मित्र मंडळ, तुळजापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. 


 
Top