तुळजापूर एस. टी. आगारात पुण्यशलोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठया उत्सवात साजरी
===================
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धाराशिव विभाग अंतर्गत तुळजापूर आगारात ढोल ताशाच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठया प्रमाणात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.
सकाळी तुळजापूर आगार व्यवस्थापक श्री. महेश रामपुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ढोल ताशाच्या गजरात बसस्थानक परिसर दुमदूमन गेला होता.
राजामाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमा निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम दिवसभर चालला होता. अन्नदानासाठी अन्नदाते श्री. भाऊसाहेब कावरे, श्री तानाजी क्षिरसागर व श्री. सागर बादगुडे यांनी या कार्यक्रमसाठी सढळ हाताने मदत केली होती.
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला, गोपाबाई दमानी ब्लड बँक सोलापूर यांच्या सहकार्याने तुळजापूर आगारातील उत्कृष्ट नेतृत्व श्री. सागर बादगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात 31रक्तदत्त्यानी रक्तदान केले. रक्तदान करून घेण्यासाठी पुरुष व महिला यांची उपस्थिती दिसून आली.
या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग राज्यस्तरीय" आरोग्यरत्न " पुरस्कार प्राप्त विजेते श्री. तानाजी क्षिरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अन्नदाणाची व्यवस्था चोख करण्यात आली होती. सर्व प्रवासी व एस. टी. महामंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी अन्नदाणाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी श्री. आबासाहेब सलगर, श्री. नितीन इंगळे, श्री. शंकर क्षिरसागर, श्री. म्हेसराज पटेल, श्री. प्रवीण हुंडेकर, श्री. समाधान शिंदे, श्री. प्रल्हाद खटके, श्री. गणेश घंदुरे, श्री बालाजी सोनटक्के, श्री. पांडुरंग रोकडे, श्री. हनुमंत शेळके, श्री. जोतिराम माळी, श्री. कल्याण सोनटक्के, श्री. अमोल जाधव, श्री. अशोक धर्मे, व तुळजापूर आगरातील सर्व चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.