पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन
धाराशिव प्रतिनिधी
देवकते गल्ली येथे शिवसेना संपर्कप्रमुख सुरज साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नितीन देवकते,
एच.एम देवकते, पिंटू कोकाटे, महेश देवकते, संतोष देवकते, अशोक सोलंकार, राजाभाऊ देवकते, दत्ता देवकते, ज्ञानेश्वर ठवरे, आबा देवकते, खंडू ठवरे, रामेश्वर घोगरे, शुभम पांढरे, आकाश शेंडगे, अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी , नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवींनी केलेले लोककल्याणकारी कार्य, न्यायप्रिय प्रशासन व समाजसेवेचा आदर्श यांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.