भुम (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे मतदार यादी पुनर्निरीक्षण संदर्भात जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एसआयआरच्या कामकाजासंदर्भात प्रत्येक विधानसभेचा आढावा मांडण्यात आला. या बैठकीचे संपूर्ण मार्गदर्शन निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेन्द्र कटके यांनी केले. यावेळी परांडा मतदारसंघातील एसआयआर संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद देत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

यावेळी राज्य परिषद सदस्य तथा परांडा विधानसभा बीएलए 1 बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस अँड.नितीन भोसले, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सचिन पाटील, तुळजापूर तालुकाध्यक्ष तथा तुळजापुरचे  बीएलए 1 आनंद कंदले, धाराशिव कळंब मतदारसंघाचे बीएलए 1 दत्ता देवळकर व तसेच इतर पक्षाचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

 
Top