अतिरिक्त पोलीस अधीक्षक पांडकर यांची श्री चौंडेश्वरी मंदिराला सदिच्छा भेट.....!
भूम
धाराशिव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी भूम परांडा तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान येथील श्री चौंडेश्वरी मंदिरामध्ये भेट दिली . यावेळी त्यांचा कोष्टी समाज बांधवांच्यावतीने सन्मान केला .
सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी धाराशिव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी पदभार स्वीकारल्या नंतर प्रथमच दि २ जून २०२६ रोजी भूम आणि परांड्याचा दौरा केला . या दौऱ्या दरम्यान त्यांनी भूम शहरातील श्री चौंडेश्वरी मंदिर येथे सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले . यावेळी त्यांचा समस्त कोष्टी समाज बांधवांच्या वतीने . समाज ट्रस्टच्यावतीने श्रीकृष्ण मूर्ती, शाल , बुके देऊन सन्मान केला .
यावेळी समाज ट्रस्ट अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल बागडे, सचिव पत्रकार शंकर खामकर, नगरसेवक नवनाथ रोकडे, उपाध्यक्ष श्याम वारे , ज्येष्ठ समाज बांधव प्रकाश बागडे, आदर्श शिक्षक संदीप बागडे, सोमनाथ बागडे, अशोक बोत्रे, सुनील आसलकर, शैलेश फलके , राम वारे,, बारीकराव
पाकले , आबासाहेब नवले, योगेश दिवटे , मधुकर भागवत, सागर भागवत, योगेश आसलकरसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .