युवा गझलकारांसाठी गझल मंथन
साहित्य संस्थेची मोफत कार्यशाळा
( गझल शिकणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी )

धाराशिव (11.06.2026) : गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने युवा गझलकारांसाठी लवकरच विशेष गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या युवा गझल स्पर्धा आणि अखिल भारतीय युवा गझल संमेलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

     गझल मंथन साहित्य संस्थेच्या असे निदर्शनास आले की, स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक नवोदित कवींमध्ये लेखनाची क्षमता असूनही त्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शनाची गरज असल्याचे जाणवले. त्यामुळे काही गुणवंत कवी पहिल्या युवा गझल संमेलनापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि नवोदितांना निर्दोष गझल लेखनाचे प्रशिक्षण देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यशाळेचे प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ गझलकार डॉ. शिवाजी काळे आणि डॉ. स्नेहल कुलकर्णी कार्यभार सांभाळणार आहेत. कार्यशाळेचा कालावधी एक वर्षाचा असून ती पूर्णतः निःशुल्क राहणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक युवा गझलकारांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहभाग निश्चित करावा, असे आवाहन गझल मंथन संस्थेच्या धाराशिवच्या सभासद सुनीता गुंजाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

     नोंदणी व अधिक माहितीसाठी चेतन पवार, (९६०४२४२३३४), सुधीर महाजन (९२७३७७७५१४), व प्रणाली म्हात्रे (८७७९८७९४४६) यांच्याशी संपर्क साधावा.
गझल लेखनाची आवड असलेल्या युवा पिढीसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरणार आहे.
 
Top