तुळजापूर बसस्थानक परिसरातील घटना; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल




तुळजापूर, प्रतिनिधी :
तुळजापूर येथील जुने बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना एका भाविकाच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर गोविंद कदम (वय 55, रा. मालाड पश्चिम, मुंबई) हे 31 मे रोजी सकाळी सुमारे 9.05 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकातून तुळजापूर-मालवण बसमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेली.

घटना लक्षात आल्यानंतर कदम यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

बसस्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट?
बसस्थानक परिसरात भाविक व प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
 
Top