धाराशिव (प्रतिनिधी)- इंडिया को-ऑप क्रेडीट सोसायटी अल्पवधीत उत्तम कामामुळे यशस्वी वाटचाल करीत आहे. धाराशिव येथे मुख्यालय असलेल्या इंडिया सोसायटीच्या आता जिल्हाभर शाखा होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी सुहास पाटील यांनी केले.  इंडिया को- ऑप क्रेडिट सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या. या विशेष सभेस पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

धाराशिव येथील इंडिया को- ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. नूतन संचालक मंडळाची धाराशिव येथे  संस्थेच्या मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक धनंजय श्रीमंतराव रणदिवे, उपाध्यक्षपदी  मंजुषा कल्याण कुलकर्णी तर सचिवपदी राजेंद्र सिताराम नाईकनवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन संचालक सावंत, सोनवणे, ॲड. आनंदे मनोगत व्यक्त केले.  सभेचे आभार सचिव नाईकनवरे यांनी व्यक्त केले. सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी गजानन हालसे, निवृत्ती जाधव आदींनी परिश्रम घेतले.      

 
Top