धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील विविध गुणदर्शनाचा आढावा घेऊन, विशेष गुणवंतांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
यावेळी बीआयआर फिल्मस चे मालक धीरज देवन व क्रेडिट कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या अपर्णा देवन यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, अकॅडमिक डीन व मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते, बीएसएच विभागप्रमुख डॉ. उषा वडणे, सिव्हिल विभागप्रमुख प्रा. एस. एम. पवार, फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने, गासा इन्चार्ज डॉ. राजश्री यादव, रेडिओ तेरणाचे संजय मैंदर्गी, रामेश्वर मुंढे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी आपल्या स्वागतपर भाषणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास, संशोधनवृत्ती आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. त्यांनी महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेची माहिती देत भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. उषा वडणे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज जाधव व साई तळेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी बीएसएच विभागातील सर्व प्राध्यापकांचे विशेष सहकार्य लाभले. प्रा. वर्षा पाटील यांनी आभार मानले. यामध्ये प्रा. बी. एस. चव्हाण, प्रा. डी. डी. मुंडे, प्रा. मनोज जोशी, प्रा. व्ही. व्ही. कोकाटे, प्रा. आकाश जगताप, प्रा. वर्षा पाटील, प्रा. आरती शिंदे, प्रा. पूजा मुंडे, प्रा. सुरज इंगळे, प्रा. सुरज जाधव आणि प्रा. ऐश्वर्या सक्राते, एस. एन. नेते, रामेश्वर मुंडे, दिगंबर जाधव यांच्या सहकार्यामुळे यशस्वीरीत्या पार पडला.
