परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव -बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. बसवराजी पाटील हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. तसेच भारतीय जनता पार्टी ला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दैदिप्यमान व अभुतपुर्व यश मिळाले. या यशाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे फटाके फोडुन व मिठाई वाटुन मोठा जल्लोष साजरा करण्यात आला..
यावेळी परंडा भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, सरचिटणीस तानाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, जयदेव गोफणे, विकास कुलकर्णी, जेष्ठ नेते मनोहर मिस्कीन, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजित काकडे, हरी शिंदे, किरण देशमुख, अनिल पाटील, डॉ. अमोल गोफणे, साहेबराव पाडुळे, प्रदिप जाधव, प्रदिप लोंढे, जयंत सायकर, धनंजय काळे, गौरव पाटील, सिध्दीक हन्नुरे, मिलिंद शिंदे, समाधान कोळेकर, तुषार कोळेकर, नंदकुमार शिंदे, घनश्याम शिंदे, यशपाल बनसोडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
