धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता हे सरकार भेदभाव करत आहे त्यांच्या प्रति देखील राजकारणाची भावना या सरकारची दिसत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. 2019 च्या शेतकऱ्यांना 2026 मध्ये कर्जमाफी का नाही असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सरकारला विचारला.
कैलास पाटील म्हणाले की, बळीराजा शेत रस्ता योजना सरकार राबवत आहे मात्र यामध्ये सत्ताधारी व विरोधक यामध्ये भेदभाव केल्याच दिसत आहे. सत्ताधाऱ्यांना सात कोटी व विरोधकांना अडीच कोटी निधी दिला जात आहे. विरोधी आमदाराच्या भागात शेतकऱ्यांना रस्ते नको आहेत का? त्यांना शेतासाठी वाट मिळू नये अशी भावना सरकारचे आहे का असे प्रश्न आमदार पाटील यांनी सरकारला विचारले. विरोधी आमदार आहे म्हणून तेथील शेतकऱ्यांनाही त्याचा त्रास देणे कितपत योग्य आहे? अशाच प्रकारे कर्जमाफी देताना ही या सरकारने 2019 ला ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रति देखील राजकारणाची ही पहिलीच वेळ असेल अशी भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली. 2019 ला आमदार यांना पुन्हा 2024 ला आमदार होऊ वाटते. मग 2019 च्या शेतकऱ्याला पुन्हा कर्जमाफीचा लाभ का नाही याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे असा खोचक सवाल आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
