धाराशिव (प्रतिनिधी)- ‘मन की बात' कार्यक्रम प्रत्येक बूथ स्तरावर प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केले. आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा तसेच ‘मन की बात' कार्यक्रमाचे नियोजन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघासाठी आर्यन फंक्शन हॉल, सांजा रोड, धाराशिव येथे तर भूमपरंडावाशी विधानसभा मतदारसंघासाठी यश मंगल कार्यालय, भूम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे व जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी सविस्तर आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, मराठवाडा संयोजक, नितीन काळे, जि. प. अध्यक्षा सअर्चनाताई पाटील, मन कि बात प्रमुख ॲड. अनिल काळे, बाळासाहेब क्षिरसागर, सुरेश कवडे, महादेव वडेकर, विश्वास कोकणे, साहेबराव घुगे, नितीन भोसले, प्रदीप शिंदे, अस्मिता कांबळे, गणेश खरसडे, ॲड. दत्ता देवळकर, सौ. प्रिती कदम, सौ. नेहा काकडे, समरजीतसिंह ठाकूर तसेच दोन्ही विधानसभेतील 11 मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.