परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह परंडा येथे बुधवार दि.24 जून रोजी धाराशिव जिल्हाचे  जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी शहराची निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक घेण्यात आली. 

यावेळी निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक सर्व शिवसैनिकांनी रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना सांगितले की, आम्ही कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे राहणार व रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार  व गद्दारांना धडा शिकवणार असे बैठकीत सांगत पक्ष बांधनीच्या विषयावर चर्चा केली. यावेळे युवा नेते विश्वजीत पाटील यांनी देखील कार्यकर्त्यास महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी शहर प्रमुख व नगर सेवक तसेच निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संखेने उपस्थित होते.


 
Top