धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे दिनांक 26 6 2026 रोजी आस बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने नालंदा फॅशन डिझायनिंग कॉलेज गोरे कॉम्प्लेक्स विसर्जन विहीर धाराशिव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गवारे माजी अध्यक्ष मराठा सेवा संघ धाराशिव प्रमुख पाहुणे ,व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर गोविंद कोकणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव शिक्षणतज्ञ एमडी देशमुख कॅप्टन बी बी बागल डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष डॉ प्रा रवी सुरवसे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गवारे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे मारुती पवार यांनी शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर गोविंद कोकणे यांचा सत्कार प्राध्यापक अंबादास कलासरे यांनी शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अंगारखे यांनी केले.
यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर गोविंद कोकणे म्हणाले की भारतीय सामाजिक सुधारणांचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणास अग्रस्थान देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक वसतिग्रहाची स्थापना केली शेतकऱ्यांसाठी राधानगरी धरण बांधले 26 26 जुलै 1902 साली संस्थानातील नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 50 टक्के जागा आरक्षित केल्य छत्रपती शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणात परखड भूमिका घेतली होती स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही तत्वे संस्थांमध्ये त्यांनी रुजवली या तत्त्वांचा अवलंब डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केला आहे राणी व्हिक्टोरिया यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना महाराजांचे महाराज ही पदवी बहाल केली होती आपल्या 48 वर्षाच्या कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानांमध्ये अमुलाग्र बदल केला होता इंग्लंड मधील जनता असे म्हणते की आम्ही आमचे राष्ट्र सोडू पण शेक्सपियरचे साहित्य आम्ही सोडणार नाही अशीच भूमिका भारतीयांनी संविधानांच्या बाबतीमध्ये घ्यायला हवी कारण भारतीय संविधानामुळेच आजपर्यंत भारत राष्ट्र म्हणून टिकून आहे वा आपण नागरिक म्हणून सुरक्षित आहोत
अध्यक्षीय समारोपात नंदकुमार गवारे यांनी संत कबीराच्या वचनाचा दाखला देत सध्याच्या भीषण वास्तवाची जाणीव करून दिली कोल्हापूर संस्थानांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी गैरहजर राहिल्यास पालकांना दंड आकारण्याचे धोरण अवलंबले होते ते शाहू महाराजांचे धोरण कुठे आणि आजच्या शिक्षणाची अवस्था काय आहे ?आजचे शिक्षण सर्वसामान्यांना परवडणारे आहे काय? आज पटसंखेच्या नावाखाली शाळा बंद केल्या जात आहेत हे धोरण योग्य नाही आज बहुजनामध्ये सामाजिक जाण्वीा विसरून उच्चभ्रू होण्याची स्पर्धा वाढली आहे याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आपण वैचारिक दृष्ट्या छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सशक्त आहोत तेव्हा यापुढे समाजातील मतभेद बाजूला सारून एकीची वज्रमुठ बांधू या व अन्यायाच्या विरोधात लढा उभा करू या अशी भूमिका मांडली
कार्यक्रमाचे आभार मारुती पवार यांनी मांडले कार्यक्रमास बालाजी तांबे, अशोक सावंत, प्राचार्य डॉक्टर मुकुंद गायकवाड, एन एल गोरसे, सुदेश माळाले, प्रा राम चंदनशिवे, एम डी जानराव, पृथ्वीराज चिलवंत, विकास काकडे, उमाकांत कुलकर्णी,अशोक बनसोडे, प्रभाकर बनसोडे ,नितीन माने ,सिकंदर पटेल ,दीपक कांबळे, सजीयोदिन शेख, रमेश कांबळे ,सुरेश शेळके, एडवोकेट अजित कांबळे,अमोल गडबडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी, सदस्य ,शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.
