परंडा (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच कै.कृष्णा हरिभाऊ कदम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कै.कृष्णा हरिभाऊ कदम फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिठापुरी (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे विद्यार्थ्यांसाठी साऊंड सिस्टिम व वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे शाळेतील शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशनने केलेल्या या सामाजिक कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमास ॲड.यशपाल बगाडे, राजू जाधव सर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ते अजित भैय्या तिवारी, युवा उद्योजक अशोक भिसे, गजानन भोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब चोरमले, ग्रामपंचायत सदस्य अमोल तरटे, लक्ष्मण तरटे, नितीन चोरमले, उमेश चोरमले, दिनेश नरूटे, शशिकांत चोरमले, गणेश शिंदे, युवराज सोनवणे, प्रशांत कोळी, अंगणवाडी सेविका निर्मला शिंदे, मदतनीस पल्लवी नरूटे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामदास होरे सर व आमले सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने कै.कृष्णा हरिभाऊ कदम फाउंडेशनचे सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
