मुरुम (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‌‘वर्षा' या शासकीय निवासस्थानी नवनिर्वाचित विधान परिषद आ. बसवराज पाटील यांनी सहकुटुंब सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‌‘वर्षा' या शासकीय निवासस्थानी धाराशिव, बिड, लातूर नवनिर्वाचित विधान परिषद आ.बसवराज पाटील यांनी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करुन मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नवनिर्वाचित विधान परिषद आ. बसवराज पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बॅक चेअरमन तथा मुरुम नगराध्यक्ष बापुराव पाटील, जावई सचिन गुदगे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना उमरगा, लोहारा तालुका सह अध्यक्ष शरण पाटील, जावई सचिन गुदगे, सौ.संपदा शरण पाटील , स्मिता पाटील  कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

 
Top