मुरुम (प्रतिनिधी)-  दि .23 जून 2026 रोजी जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे चालु असलेल्या वार्षिक कँपमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट अर्जुन पाचंगे ची 26 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे प्रजासताक दिन परेडसाठी तसेच वायईपी कँपसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती त्याबदल अर्जुनचा यावेळी सत्कार छ.संभाजीनगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर ए जी बारबरे यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन छ .संभाजीनगरच्या ग्रुप कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.ब्रिगेडिअर बारबरे यांनी यावेळी कॅडेटसना मार्गदर्शन करताना युवकांमध्ये एनसीसीची स्थापना ज्या उदेश्याने केली आहे ते म्हणजे युवकांमध्ये अनुशासन,नेतृत्व,शिस्त,अथक परिश्रम,आत्मविश्वास याचे पालन करून देशाची सेवा करावी असे सांगितले.तसेच बी व सी प्रमाणपत्र पास होणाऱ्या कॅडेटसना एसएसबी सीडीएस ची परीक्षा देऊन सरळ अधिकारी होता येते तसेच सैन्यदल,पोलीस,बीएसएफ, सीआरपीएफ,रेल्वे अशा अनेक क्षेत्रात विशेष संधी एनसीसी प्राप्त करून देते.तसेच आज एनसीसी लातूर बटालियनच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील कॅडेटसनी सलग दोन वर्ष दिल्ली येथे जाऊन एक अनोखी ओळख अर्जुन पाचंगे, वैभवी शेंडगे यांच्या माध्यमातुन ऑल इंडियाच्या फायरिंग,ड्रिल,खेळ, ऑबस्टिकल,थल सैनिक कँप, एक भारत श्रेष्ठ भारत अशा कँपमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे तसेच या कॅडेटसना आदर्श मानुन एनसीसीचे नावलौकिक कमवावे असे या कँपदरम्यान आपल्या शिबीराच्या मार्गदर्शन प्रसंगी बारबरे यांनी व्यतित केले.या कार्यक्रमासाठी लातूर बटालिअन चे कर्नल संतोष नवगण,कर्नल वाय बी सिंग सर,सुभेदार मेजर शंभु सिंग कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले 450 कॅडेटस 35 पीआय स्टाफ कर्मचारी ,45 शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते .

या यशाबदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ संजय अस्वले सर्व प्राध्यापक , कर्मच्याऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 
Top