श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टाच्या संदेश झाकडे याची भारतीय सैन्य दलात निवड
महाविद्यालयात उपस्थित राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश मिळेल
प्राचार्य डॉ संजय अस्वले
(मुरुम प्रतिनिधी)
भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालयातील कला शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी संदेश रंजीवन झाकडे याची भारतीय सैन्य दलातील निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर तसेच महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. राजकुमार सोनवणे, आदी उपस्थित होते.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झालेल्या सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अस्वले यांनी महाविद्यालयात शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यानी केली तर पदवी पूर्ण होताच सरकारी नोकरी मिळू शकते. त्यासाठी विद्यार्थ्यानी महाविद्यालयात हजर राहून करिअर कट्टा, एन एस एस, एनसीसी, स्पर्धा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र ग्रंथालय याचा वापर करावा. त्यासाठी पुणे, मुंबई जायची गरज नाही. महाविद्यालयातील या वर्षी 26 विद्यार्थी आर्मी आणि पोलिस भारती झाले आहेत. कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्त यांच्या बळावर पोलिस, आर्मी भरती प्रक्रियेत संपादन केल्यामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा उंचावली आहे. विद्यार्थ्यांनीही त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.