उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई ; 18 दिवसांत 146 गुन्हे उघड, 126 आरोपींना अटक,27 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त*
धाराशिव दि.4 जून (जिमाका) भारत निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून,आदर्श आचारसंहिता दिनांक 18/05/2026 पासून लागू करण्यात आलेली आहे.या आचारसंहिता कालावधीत अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धाराशिव कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व अधिकाऱ्यांद्वारे अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्री यावर पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने श्री.राजेश देशमुख,आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य,मुंबई; श्री.प्रसाद सुर्वे,सह आयुक्त (अं.ब.द.), राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य, मुंबई; श्रीमती संगिता दरेकर,विभागीय उपआयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,छत्रपती संभाजीनगर विभाग,छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार तसेच श्री.हर्षवर्धन शिंदे,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18/05/2026 ते 04/06/2026 या कालावधीत कार्यवाही करण्यात आली.
या कालावधीत एकूण 146 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 126 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसेच 4 वाहने जप्त करण्यात आली आहेत.या कारवाईत देशी दारू 388.6 बल्क लिटर,विदेशी दारू 82.44 बल्क लिटर,बिअर 54 बल्क लिटर,अवैध हातभट्टी 5150 बल्क लिटर,रसायन 40260 बल्क लिटर व ताडी 548 बल्क लिटर असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत 27 लक्ष 53 हजार 770 रुपये इतकी आहे.
कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
*हातभट्टी निर्मिती,विक्री व वाहतूक*
नोंदविलेले गुन्हे : 120 | अटक आरोपी : 101 | मुद्देमाल : 5150 बल्क लिटर | रसायन : 40260 बल्क लिटर | वाहने : 4 | मुद्देमाल किंमत : 23 लक्ष 17 हजार 150/रुपये इतकी आहे.
*हॉटेल/ढाबा*
नोंदविलेले गुन्हे : 10 | अटक आरोपी : 10 | मुद्देमाल : 136.44 बल्क लिटर (विदेशी मद्य व बिअर) | वाहने : 0 | मुद्देमाल किंमत : 31 हजार 600 रुपये आहे.
*अवैध ताडी*
नोंदविलेले गुन्हे : 5 | अटक आरोपी : 5 | मुद्देमाल : 548 लिटर ताडी | वाहने : 0 | मुद्देमाल किंमत : 21 हजार 680 रुपये इतकी आहे.
*परराज्यातील मद्य*
नोंदविलेले गुन्हे : 1 | अटक आरोपी : 1 | मुद्देमाल : 54 बल्क लिटर परराज्यातील विदेशी मद्य | वाहने : 0 | मुद्देमाल किंमत : 2 लक्ष 63 हजार 600 रुपये इतकी आहे.
दरम्यान,पुणे जिल्ह्यात दिनांक 26 मे ते 28 मे 2026 दरम्यान फुगेवाडी, हडपसर,दापोडी (पुणे शहर व पिंपरी-चिंचवड) भागात विषारी दारूमुळे नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.अशा घटना धाराशिव जिल्ह्यात घडू नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना अधिक कठोर करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर दिनांक 28/05/2026 ते 04/06/2026 या कालावधीत करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कारवाईत आजपर्यंत एकूण 83 गुन्ह्यांची नोंद झाली असून 70 आरोपींना अटक करण्यात आली आहे.या कारवाईत 2 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या टप्प्यात देशी दारू 309.18 बल्क लिटर,विदेशी दारू 60.48 बल्क लिटर,परराज्यातील मद्य 54 बल्क लिटर,अवैध हातभट्टी 3765 बल्क लिटर,रसायन 29500 बल्क लिटर व ताडी 100 बल्क लिटर असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत 17 लक्ष 65 हजार 980 रुपये इतकी आहे.
ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धाराशिव कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्री याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 अथवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर माहिती द्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,असेही आवाहन करण्यात आले आहे.
**************