भुम प्रतिनिधी : टायर पंचरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पार्डी ता. वाशी येथील सूर्यकांत शिंदे यांच्या दोन मुलींची जिद्द, चिकाटी, संघर्ष व अपार मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलीस शिपाई पदी निवड झाली असून या निवडीचे परिसरातून कौतुक होत असून दोन्ही बहिणीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
     पार्डी ता. वाशी येथील सूर्यकांत शिंदे हे टायर पंचरचे दुकान चालवून तीन मुली, पती पत्नी असा पाच व्यक्तींच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या दोन मुली पूजा शिंदे वय २२ वर्षे शिक्षण बीए उत्तीर्ण व प्रीती शिंदे वय २१ वर्ष शिक्षण बारावी उत्तीर्ण यांचे मुंबई पोलीस शिपाई पदी दि. २८ मे रोजी निवड झाली असून दोन्ही भगिनींनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना केवळ आई-वडिलांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून दोन वर्ष दहा महिन्यांचा कठीण सराव व मेहनत करून जिद्द, चिकाटी, संघर्ष व अपार मेहनत करून हे यश संपादन केले आहे. या दोघी बहिणींना एस. के. फिटनेस क्लबचे संस्थापक सागर खालकर सर व संगमनेर येथील सह्याद्री करियर अकॅडमीचे संस्थापक अमोल राहणे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मुंबई पोलीस शिपाई पदी निवड झाल्याची बातमी मिळतात परिसरातील नागरिकांनी दोघी बहिणींवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
 
Top