--

तुळजापूर - तुळजापूर येथील पतसंस्था क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री नारायण नन्नवरे यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून श्री संजय व्हटकर यांची संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक प्रकिया पार पडली असून यात संस्थेच्या संचालक मंडळाच्या सर्वच ११ जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत यात सर्वसाधारण मतदार संघातून नारायण पांडुरंग नन्नवरे, संतोष निवृत्ती इंगळे, दिपक दत्तात्रय कुंभार, श्रीकांत मुकुंद देशमाने, बालाजी मधुकर डोंगरे, श्रीकांत दीनानाथ भोजने. महिला राखीव मधून सौ राधा शिवाजी गायकवाड, सौ शरयू सज्जनराव जाधव तर भटक्य विमुक्त जाती जमाती मतदार संघातून रवींद्र धोंडिबा ताटे इतर मागासवर्गीय मतदार संघातून ऍड अंजली दादाराव साबळे ह्या तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून संजय दत्तोबा व्हटकर हे बिनविरोध निवडून आले आहेत संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री व्ही. एस. जगदाळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तुळजापूर यांनी काम पाहिले त्यांना श्री ए व्ही जाधव सहकार अधिकारी तुळजापूर व संस्थेचे सचिव श्री सज्जन जाधव यांनी सहकार्य केले
 
Top