श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात हाती घेण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या अनुषंगाने तसेच भाविकांचे दर्शन अधिक सुलभ, सुरक्षित व सुरळीत होण्याच्या दृष्टीने मंदिरातील प्रवेश व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व संवर्धनाच्या कामास दिनांक 01 जून 2026 पासून प्रारंभ झाला असून, मंदिर परिसरात विविध विकासकामेही प्रगतीपथावर आहेत. या कामांच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी सुधारित प्रवेश व्यवस्था लागू करण्यात येत आहे.

त्यानुसार दिनांक 03 जून 2026 रोजी पहाटे 04.00 वाजल्यापासून खालीलप्रमाणे प्रवेश व्यवस्था राहील :

* सिंहासन पूजा पासधारक भाविक तसेच ₹500 देणगी दर्शन पासधारक भाविक यांना राजे शहाजी महाद्वार मार्गे प्रवेश देण्यात येईल.

* अभिषेक पूजा पासधारक, ₹200 देणगी दर्शन पासधारक, धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी येणारे भाविक यांना बिडकर पायऱ्या मार्गे प्रवेश देण्यात येईल.

मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेकरी तसेच भाविक भक्तांनी या बदलाची नोंद घेऊन संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उपेंद्र तामोरे यांनी केले आहे.
 
Top