तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
धाराशिव
येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. सहयाद्री ब्लड बँक च्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थी आणि स्टाफ यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
तसेच यावेळी महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले .
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शासकीय स्त्री रुग्णालयात फळाचे वाटप करण्यात आले.
सर्वात अगोदर डॉ. पद्मसिंह पाटील साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने , तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी बी मोरे ,डॉ. डी डी दाते, डॉ.प्रशांत कोल्हे,प्रा.शीतल पवार ,प्रा पी. एम. पवार ,प्रा.सुनीता गुंजाळ
यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी डॉ. पद्मसिंह पाटील साहेब यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी ते बोलताना म्हणाले की डॉक्टर साहेबांनी धाराशिव सारख्या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाचीस्थापना करून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली. यामुळे या महाविद्यालयातून तयार झालेले हजारो अभियंते आज देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदावर कार्यरत आहेत.याचे श्रेय अर्थात डॉक्टर साहेबांना आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. यावेळी डॉ. डी बी मोरे,,डॉ. डी. डी. दाते,डॉ. प्रशांत कोल्हे, प्रा.सुनिता गुंजाळ, डॉ. अनघा तोडकरी, प्रा. वर्षा बोंदर, प्रा.ज्ञानेश्वर
हराळकर , प्रा.ताटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनीता गुंजाळ यांनी केले तर आभार डॉ.राजश्री यादव यांनी मानले.
