पंकज जमादार , महेश रणखांब मुंबई पोलीस तर रोहित धनेराव महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झाल्या बदल सत्कार
(मुरुम प्रतिनिधी)

दि .28 मे 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट पंकज जमादार,महेश रणखांब याची मुंबई पोलीस पदी निवड झाली. तसेच कॅडेट रोहित धनेराव याची पण मीरा भांईदर येथे महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाली.ही निवड प्रक्रिया नुकतीच जाहिर करण्यात आली यामध्ये महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची यशाची परंपरा कायम राखण्यात कॅडेटस यशस्वी ठरले.आता पर्यंत अनेक कॅडेटस वेगवेगळ्या क्षेत्रात भरती होत आहेत .या यशिस्वेतेबद्दल प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी त्याचा सत्कार करून पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या .या सत्कार समयी प्राचार्यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सर्व यशस्वी कॅडेटसचे मार्गदर्शन घ्यावे व आपणही पुढील वर्षी होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यश संपादन करून आपले जीवन सार्थकी लावावे असे त्यांनी आव्हान केले. उमरगा हे तालुक्याचे व ग्रामीण भाग जरी असला तरी यशाची दरवाजे हे येथुनच उघडतात यासाठी महाविद्यालय नेहमी आपणास सर्वोत्तपरी सहकार्य करण्यास बांधिल असेल असे यावेळी अस्वले यांनी प्रतिपादन केले.या सत्कार समयी डॉ पद्माकर पिटले कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले , प्रा गुंडाबापू मोरे ,प्रा शैलेश महामुनी,राजकुमार सोनवणे, नितीन कोराळे प्राध्यापक, कॅडेट्स उपस्थित होते .
 
Top