डॉ. पाटील यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने उत्साहात साजरा !
स्वर्गीय डॉ.चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे आदरणीय डॉक्टर साहेबांचा वाढदिवस अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर तसेच इतर मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या आदरणीय डॉक्टर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सह अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विक्रमसिंह माने प्राध्यापक वृंद तेरणा स्टडी सेंटरचे विठ्ठल गायकवाड ईश्वर बनसोडे व सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होते