धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीपतराव भोसले हायस्कूलने सालाबादाप्रमाणे याही वर्षी देदिप्यमान कामगिरी बजावत यशाची परंपरा कायम राखत उज्ज्वल यश प्राप्त केले असून प्रशालेचा 97. 31% निकाल लागला असून एका मुलीला 100 % गुण प्राप्त झाले.

 महाराष्ट्रातील सर्वात मोठी विदयार्थी संख्या असलेली मराठी माध्यमाची शाळा म्हणून ओळख असलेल्या या प्रशालेत इयत्ता दहावीला 1005 विदयार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 978 विदयार्थी उत्तीर्ण झाले. शेकडा 90 % पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल 138 विदयार्थी उत्तीर्ण झाले. तर 75% पेक्षा जास्त गुण घेणारे विदयार्थी -373 असून 35 ते 75 % मधील गुण प्राप्त विदयार्थी 517 आहेत. प्रशालेतून अनुक्रमे प्रथम येण्याचा मान 100 % घेऊन अर्पिता वाडकर हिने पटकावला तर द्वितीय क्रमांकावर शार्दूल दत्तात्रय मोहिते, संजिली महेश राजे, अमित बालाजी जगताप, सौंदर्या जाधव, मयुरी चौधरी, शिवराज अदाटे यांनी 99.60% गुण घेतले. तर तृतीय क्रमांकावर अंकिता म्हात्रे हिने 99.40% प्राप्त केले.

या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचा व पालकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले.  तर त्यांनी आता लातूर किंवा पुण्यासारखे शहरात पुढील शिक्षणाला जाण्याऐवजी धाराशिव येथेच फिजिक्सवाला या कोचिंग क्लासच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण उपलब्ध केले असून आपण नवीन  धाराशिव पॅटर्न तयार करुन आपल्या शहराचे नाव देशपातळीवर नेऊ असा विश्वास पालकांना दिला. तसेच सरचिटणीस प्रेमा सुधीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक  यशवंत इंगळे, पर्यवेक्षक प्रवीण बागल, बी.बी. गुंड, कुमार निकम, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ, बालाजी गोरे व गुणवत्ता सुधार समितीचे प्रमुख मनोज भुसे, शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांचे अभिनंदन केले.


 
Top