धाराशिव (प्रतिनिधी)- जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रूपामाता माध्यमिक विद्यालय, पाडोळी (आ.) तसेच संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लासोना या दोन्ही विद्यालयांनी मार्च 2026 च्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.

रूपामाता माध्यमिक विद्यालय, पाडोळी (आ.) या विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.63 टक्के लागला असून विद्यालयातील एकूण 73 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून 34 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले, तर 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह 28 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आदित्य सुखलाल गुंड याने 94.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. संचिता व्यंकट गुंड हिने 93.60 टक्के गुणांसह द्वितीय, तर रेणुका सतीश चव्हाण हिने 92.60 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच प्रियंका नवनाथ माने (92.40%), मयुरी सोमनाथ स्वामी (91.60%), मंगेश राजेंद्र झिरमिरे (91%), साक्षी गौतम एकंडे (89.80%), पुनम धनराज माने (88.80%), सार्थक उत्तम गुंड (88.60%) आणि आदित्य तुकाराम गुंड (88.60%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लासोना या विद्यालयाने दहावी परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली. विद्यालयातील 08 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 03 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शेरीकर साहिल हुसेन (89%) प्रथम, मेंढके अमन रज्जाक (87%) द्वितीय, तर पाटील आरती अमोल (85.60%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच साळुंके समीक्षा गोवर्धन (83.40%), वैष्णवी सतीश ढोबळे (81.80%), रमजान अल्लानूर शेख (81%), स्नेहा विकास थोरात (79.80%) आणि शिवराज शरद माने (78.60%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक  ॲड. व्यंकटराव विश्वनाथराव गुंड पाटील, संस्थेचे मार्गदर्शक सुधाकर गुंड (गुरुजी), सचिव श्रीमती कौशल्या सुधाकर गुंड पाटील, रूपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड पाटील, ॲड. शरद गुंड पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

तसेच रूपामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनसुळे सर व सर्व शिक्षकवृंद तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भोंडे सर, गुंडरे सर, पवार सर, शिवानंद पवार, वाघमारे, माळी मॅडम, परतापुरे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 
Top