धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.26) अभिवादन करण्यात आले.

धाराशिव शहरातील काँग्रेस भवन येथे अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते स्व.विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व.विलासराव देशमुख यांच्या आठवणींना अनेकांनी आपल्या मनोगतात उजाळा दिला. बाभळगाव ग्रामपंचायतचे सरपंच, धाराशिव-लातूर जिल्हा एकत्र असताना धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य ते आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री असा मोठा राजकीय प्रवास करणारे स्व.विलासराव देशमुख यांनी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सातत्याने  केले. धाराशिव आणि लातूरच नव्हे तर विकासापासून वंचित असलेल्या मराठवाड्याला न्याय देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न करून त्यात यहशी मिळविले. त्यामुळेच त्यांची ओळख महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात आहे. कोणतेही काम चुटकीसरशी सोडविणारे, सतत हसतमुख असणारे स्व.विलासराव आपल्यात नाहीत याची खंत अनेकांनी यावेळी व्यक्त करण्यात आली. अभिवादन कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, नगर परिषदेचे माजी गटनेते खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, मिलिंद गोवर्धन, सरफराज काझी, धनंजय राऊत, प्रभाकर लोंढे, भारत काटे, वसंत मडके, अंकुश पेठे यांचेसह आजी - माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top