धाराशिव (प्रतिनिधी)- प्रशासनाच्या विविध कामकाजांचा समन्वय प्रभावीपणे राखण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तलमोड, कसगी आणि कोथळी या सीमा क्षेत्रांसाठी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार जबाबदाऱ्या निश्चित करत अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत.

पोलीस यंत्रणेकडून पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, तलमोड परिसरासाठी पोलीस उपनिरीक्षक वाजिद शेख (मो. 9823441648), पीसी 127 योगेश सूर्यवंशी (मो. 8421011505) आणि पीसी 1759 विनोद मोरे (मो. 9665285007) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कसगी परिसरासाठी पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड (मो. 9822541877), एचसी 996 गोवर्धन शिंदे (मो. 9011011996) तसेच पीसी 1785 सुखदेव जाधव (मो. 8087642536) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोथळी परिसरासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन मुसम येथील बालाजी निवृत्ती कांबळे (मो. 9545950029), पीसी 1121 श्रीहरी नरसिंग फुगटे (मो. 8424042015), पीसी 1481 देविदास कारिनाथ वाघे (मो. 7744062426) आणि पीसी 859 नितीन विश्वनाथ हुंडे (मो. 8830549071) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परिवहन कार्यालयाकडून तलमोडसाठी दत्तू रावते (मो. 9733317711), कसगीसाठी विनोद लोणकर (मो. 9881168887) आणि कोथळीसाठी हनुमंत कोळेकर (मो. 9503649717) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, परिवहन कार्यालय धाराशिव या पदावर कार्यरत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून गटविकास अधिकारी उमरगा प्रशांतसिंह मरोड (मो. 9881778001) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून तलमोड परिसरासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येरोळे सुयोग बालाजीराव (मो. 8275006043),कसगीसाठी डॉ. युवराज धोंडीराम बिराजदार (मो. 9422654460) तसेच कोथळीसाठी डॉ.प्रणव प्रल्हादराव देशमुख (मो. 8805955330) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान,आवश्यकतेनुसार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.हा आदेश दि. 25 मे 2026 पासून ते दि. 31 मे 2026 या कालावधीसाठी लागू राहणार आहे.


 
Top