तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनात देशभरातून खाजगी वाहनाने भाविक मोठ्या संख्येने येतात त्यात सर्वाधिक भाविक हे कर्नाटकातून येतात या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाहनाचे त्याचा तपासणी खाली मोठी लूट होत असल्याचा आरोप कर्नाटक सह महाराष्ट्रात राज्यातील  वाहनचालकातून होत आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शणार्थ जाताना आधी दक्षिणा महामार्ग पोलीसला व नंतर तुळजाभवानी चरणी माथा ठेकावयास मिळत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापुरात दररोज वीस ते पंचवीस हजार गाड्या विविध महामार्गातून तुळजापुरला येतात. 

मात्र या संधीचा लाभ घेत महामार्ग पोलीस चक्क तपासणीच्या नावाखाली विविध किरकोळ कारणे दाखवून भाविकांचे आर्थिक लुट करत आहेत. यात कर्नाटक राज्यातील भाविकांना याचा मोठा फटका बसत आहे. बिचारे इतर राज्यातून आलेले असल्यांना यांचे मोठी गोची होत आहे. महाराष्ट्राची मोठी बदनामी होत आहे. या गोष्टीकडे सर्वत्र दुर्लक्ष दिसत आहे. विशेष म्हणजे तीर्थक्षेत्र तुळजापुरात महामार्गावरच हजारो वाहने लावले जात असतात. मात्र त्याकडे या महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष ठळकपणे दिसून येते व जिथे निर्जन महामार्ग आहे तिथे मात्र हे महामार्ग पोलीस चक्क ठाण मांडून उभे राहतात. तुळजापूर नगर तुळजापूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव महामार्गावर महामार्ग पोलिसांकडून वाहनचालकांकडून कागदपत्र तपासणीच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात असल्याचे गंभीर आरोप समोर येत असून, यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या 40 तापमानातही भर दुपारी तसेच रात्रीच्या वेळी तपासणीच्या नावाखाली मालवाहतूक तसेच खासगी वाहनधारकांना अडवून पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या आरोपांमुळे महामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महामार्गावरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच अशा प्रकारचे आरोप होत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

 
Top