कळंब (प्रतिनिधी)- शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने कळंब बस आगारातील वाहक, चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी दहावी व बारावी परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव सोहळा दि.20 रोजी कळंब बस आगारात उत्साहात पार पडला. यावेळी आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख विजयकुमार घोलप होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यशाळा अधीक्षक अभिजीत कवडे ,कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास मुळीक उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर वाहतूक नियंत्रक सुशील हुंबे, नामदेव जागताप, गोविंद जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रार्थ भिसे 97.60 टक्के, प्रांजल चौधरी 94.80 टक्के, श्री जाधवर 94.40 टक्के, यश भिसे 91.40 टक्के, स्मिता घेवारे 89.00 टक्के, समुद्धी ओव्हाळ 85.20 टक्के, प्रज्ञा जाधव 84.00 टक्के, अमर कुचेकर 81.50 टक्के, अजय औसेकर 81.17 टक्के, विराज गायकवाड 80.20 टक्के, अक्षरा भांगे 78.20 टक्के, आकांक्षा शिंदे 76.60 टक्के, वैष्णवी थोरात 82.00 टक्के, माऊली पवार 77.33 टक्के, मानसी मुळीक 76.67 टक्के, प्रथमेश गोरे 76 टक्के.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश गोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समिती तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळ कळंब आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
