भूम (प्रतिनिधी)- भारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर, भूम येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी स्वानंदी हारिभाऊ महामुनी हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
अत्यंत कमी वयात मिळविलेल्या या यशामुळे शाळा, पालक व भूम शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वानंदी हिने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विविध स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी लहान वयापासून अभ्यासाची आवड जोपासल्यास मोठे यश मिळविता येते, हे स्वानंदीच्या यशातून दिसून येते. स्वानंदी हारिभाऊ महामुनी हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
