तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राणी लक्ष्मीबाई उद्यानातील सिंहाच्या जबड्यात हात घालून उभ्या असलेल्या भव्य-दिव्य पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर कडक उन्हातही शंभूप्रेमींची मोठी रांग लागली होती.
सकाळी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील विविध शासकीय कार्यालयांतही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठा क्रांती ठोक मोर्चा, स्वराज्य पक्ष, शिवबाराजे प्रतिष्ठान आणि जनहित संघटना यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटप करण्यात आले. तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संघटनांनी अभिवादन केले. यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, नगरसेवक मनोज गवळी, अर्जुन साळुंके, अजय साळुंके, कुमार टोले, आण्णासाहेब क्षिरसागर, रतन कवडे, प्रणव देवकते, आंबेश्वर देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
दरम्यान, तुळजापूर नगर परिषद यांच्या वतीनेही धर्मवीर संभाजी राजे यांचे पूजन करण्यात आले. यावेळी नप गटनेते अमोल कुतवळ, आनंदा जगताप, रणजीत इंगळे, अक्षय कदम, अमर हंगरगेकर, नरेश अमृतराव, पंडितराव जगदाळे, मधुकर शेळके, रत्नदीप भोसले, पाणीपुरवठा सभापती सागर कदम, दिनेश शिरसागर, आनंद सावंत, विजय कंदले यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर शहरात दिवसभर उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
