भुम (प्रतिनिधी)- 12 मे 2026 महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्यात माधव दत्ता पोतरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा श्री साईबाबा सांस्कृतिक भवन शिर्डी येथे 12 मे 2026 रोजी मंगळवारला मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले उपस्थित होत्या. तर सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. सुप्रसिद्ध कवी रोहित शिंगे होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे व सचिव कोळी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रस्तुत पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट, उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षकांची निवड केली जाते. माधव दत्ता पोतरे हे जि. प. प्रा. शा. सावरगाव (पा), ता. भूम जि. धाराशिव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून, तंत्रस्नेही शिक्षक, नावीन्यपूर्ण उपक्रमशिल, उत्कृष्ट आदर्श शिक्षक, विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती देत भविष्यात स्पर्धाचे महत्व मुलांना समजावून सांगण्याचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा नातलग आणि कुटुंबासमवेत गौरव करण्यात आला.संबधीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पाथरूड केंद्रातील शिक्षक बंधू -भगिनी व शिक्षक वर्गातून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षांव होत आहे. त्यांचे हे कार्य शिक्षण क्षेत्रातील अभिमानस्पद असून ते इतरांना प्रेरणादायी आहे.
