भुम (प्रतिनिधी)-  येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी पालक-शाळा संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे पर्यवेक्षक राम सोळंके आणि मराठी विषयाचे प्रा. गंगाधर काळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, करिअर संधी आणि शिस्त याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीकडे लक्ष देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनश्री पिंपळे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. गंगाधर काळे यांनी मांडली, तर उपस्थित पालकांचे आभार प्रा. चंद्रकांत शिंदे यांनी मानले. या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

 
Top