धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास संघटनेचे अरुण बनसोडे, दिलीप वाघमारे, सुनील बनसोडे ,अशोक बनसोडे, बाळासाहेब माने, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामूहिक त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना ,घेण्यात आली.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, तथागत बुद्ध एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी मानवी जीवन दुःखमय आहे हे जगाला सांगितलं मानवाच्या आनिर्बंध इच्छा दुःखाचं मूळ कारण आहे. आनिर्बंध इच्छांना प्रतिबंध केल्यास दुःख दूर केल जाऊ शकतो व दुःख दूर करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग या मार्गाने गेल्यास मानव दुखापासून दूर जाऊ शकेल. म्हणून आज जगाला बुद्धाच्या मार्गाने जाण्याची आवश्यकता आहे. जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे हे जगाने आज मान्य केल आहे. बुद्ध व्यक्तीला वर्तमानात जगायला शिकवतात त्यांनी दिलेली शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अडीच हजार वर्षानंतर आपणास बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून दिली आहे. बुद्ध धम्म हा मानवी जीवनात आचरणाचा भाग आहे म्हणून बुद्ध मार्गाने जाण्यासाठी मानवी जीवनात कृती महत्त्वाची आहे. अष्टांग मार्ग व दहा पारमिता हा आपल्या जगण्याचा भाग झाला पाहिजे. असे विचार विजय गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे अरुण बनसोडे, दिलीप वाघमारे, अशोक बनसोडे, सुनील बनसोडे ,रोहिदास झेंडे, प्रा राम चंदनशिवे, यु व्ही माने, सतीश बनसोडे, राजन माने, आल्टे साहेब ,श्रीकांत चिलवंत, प्रभाकर बनसोडे, पांडुरंग सवाई ,बलभीम कांबळे ,बाळासाहेब माने, प्रदीप शिंदे, धावारे सर, इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
