भुम (प्रतिनिधी)- आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या प्रवक्तेपदी दि. 12 मे रोजी सहा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. शहरातील साहिल मंगल कार्यालय येथे आयोजित संवाद बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. बैठकीत आगामी राजकीय वाटचाल, शहर विकासाचे प्रश्न तसेच संघटन बळकटीकरणावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी मार्गदर्शन करत आगामी काळातील राजकीय भूमिका आणि शहर विकासासाठी आघाडीने अधिक सक्रिय राहण्याचे आवाहन केले. बैठकीला नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, आलमप्रभू शहरी विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे, नगरसेवक सुरज गाढवे, रीमा शिंदे आणि तोफीक कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. आघाडीचे कार्य आणि विविध विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी श्रीराम मुळे, रोहन जाधव, श्रीराम भोसले, बुबकर जमादार, आसीफ जमादार आणि संजय होळकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. नगरपरिषद निवडणुकीनंतर प्रथमच पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी शहरातील विकासकामांबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदाची संपूर्ण ताकद वापरण्यात येईल. नागरिकांच्या रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. शहरातील रखडलेली रस्त्यांची कामेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, विकासकामांवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला कार्यकर्त्यांनी ठोस उत्तर देण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी बैठकीत केले. बैठकीस सुनील डुंगवाल, रहीम सौदागर, सुनील माळी, बाळासाहेब सुर्वे, अमोल माळी, आसीफ जमादार, सागर टकले, योगेश आसलकर, अतुल उपरे, हाजी बाबा पटेल, सुधीर देशमुख, सौरभ बाराते, किरण गाढवे यांच्यासह आलमप्रभू शहरी विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top