भूम (प्रतिनिधी)- इंडियन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा सावरगाव (पा) येथील विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत दक्ष माधव पोतरे 258 गुण घेऊन केंद्रात द्वितीय क्रमांक प्राप्त करून सावरगाव (पा) शाळेचे नाव उज्वल केले. स्वराली लोकरे (202), सम्राट शिंदे (194), सत्यजित यादव (182), कृष्णा महानवर (178), महादेव बोधे (174), ऐश्वर्या महानवर (154), स्वराज महानवर (150), पूर्वा यादव (140), अनिता महानवर (134), यश उबाळे (132), स्वराली यादव (130), प्रसाद महानवर (128), सिद्धार्थ महानवर (106), अरमान सय्यद (104), कुणाल कांबळे (104), शेरयू (82) यांनी उल्लेखनीय गुण प्राप्त केले. सर्व मुलांनी पहिल्यांदाच घवघवीत यश संपादन केले या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ, पालक वर्ग शिक्षणप्रेमी युवकवर्ग,मुख्याध्यापक माधव पोतरे सहशिक्षिका धनलक्ष्मी पोतरे /भुरके तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 
Top