तुळजापूर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर प्रभावी जनजागृती आणि तालुकास्तरावर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या “तालुका आरोग्य संपन्न कृतीदल” समितीत तुळजापूर तालुक्यासाठी पत्रकार श्रीकांत कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल समूहाच्या वतीने पत्रकार श्रीकांत कदम यांचा शाल, श्रीफळ व पेढा देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी लोकमंगल समूहाचे संचालक सचिन आडगळे, विनोद देवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, राहुल साळवे, आशुतोष लबडे, नगरसेवक मधुकर शेळके तसेच तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी उपस्थित होते. दरम्यान, तालुकास्तरावर आरोग्यविषयक जनजागृती, प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय वाढविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. श्रीकांत कदम यांच्या निवडीमुळे तुळजापूर तालुक्यात आरोग्य विषयक उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. 


 
Top